नावाप्रमाणे बुद्धिमान तू,

घरच्यांचा अभिमान तू.🎁

 

संकटात साथ देणारी सखी तू,

आनंदच्या संसारात सुखी तू.🎁

 

सत्याच्या बाजूने उभी राहणारी व्यक्ती तू,

प्रामाणिकपणाला जपणारी शक्ती तू.🎁

 

सीएमच्या पाठीशी उभी राहणारी बाई तू,

समस्या शांतपणे समजून घेणारी आई तू.🎁

 

मोठ्यांचा आदर ठेवत मुद्दा पटवून देणारी सहकारी तू,

छोट्यांना सांभाळून घेत अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणारी अधिकारी तू.🎁

 

नाजूक विषयात गुप्तता पाळणारी समाजकार्यकर्ती तू,

शांत न राहता असत्याच्या बाजूने पेटून उठणारी कार्यकर्ती तू.🎁

 

कायम संयमी आणि शांत राहणाऱ्या आणि समोर व्यक्ती दिसताच हसत स्वागत करणाऱ्या

मृणालिनी ताई, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁🎊🎉💐

– प्रेमा