तेंव्हाच्या पालकांना मुल फक्त या इयत्तेत आहे एवढंच माहिती असे,

आत्ताच्या पालकांसारखा मुलांच्या अभ्यासाच्या ताणाचा लवलेशही नसे.😊

 

पालकांनी शाळेत येणे म्हणजे मुलांसाठी एक शिक्षा असे,

आत्ताच्या पालक सभे सारखी अजीबात सवय नसे.😊

 

मुलांचा घरी अभ्यास घेणं म्हणजे विनोदाची गोष्ट असे,

आत्ता सारखं मुलांचा अभ्यास घेणं माहिती नसे.😊

 

शाळेची वार्षिक फी ५०रू भरणे म्हणजे सहसुलभ काम असे,

आत्ताच्या शाळेच्या फी सारखी भरमसाठ

आकारणी नसे.😊

 

मूल शाळेत जाणे म्हणजे पालकांच्या मागचा त्रास कमी होणं असे,

आत्ताच्या पालकांसारखं मुलांच्या दप्तराच ओझ वाहनं नसे.😊

 

शाळा म्हटली की मुलांनी आनंदाने खेळणे बागडणे असे,

आता सारखा अभ्यासाचा ताण घेऊन आत्महत्या करणं

नसे.😊

– प्रेमा