संकटकाळात लढण्याची शक्ती दिली

जवळचे लोकं ओळखण्याची युक्ती दिली💐

स्वतःला जाणण्यासाठीचा काळ दिला

स्वतःतील छंद जोपासण्यासाठी वेळ दिला💐

पैसा जपून वापरण्याची शिकवण दिली

नातेसंबंधातील टिकवण दिली💐

जीवन जगण्याची नवी आशा दिली

मैत्रीची नवीन दिशा दिली💐

माणसाच्या मनमानीला तडा दिला

आयुष्यभर पुरेल असा धडा दिला💐

इंटरनेटचे सकारात्मक महत्त्व दिले

मानवी मूल्यांचे तत्व दिले💐

गरजेपुरत्या खरेदीचे ज्ञान दिले

निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचे तत्वज्ञान दिले💐

मानवी हव्यासाला लगाम दिला

निसर्ग किमयेला सलाम दिला💐

– प्रेमा