आज माझ्या वहिनीबाईचा वाढदिवस
आज तुझा खूप खूप आनंदाचा दिवस

तू एक कवयत्री म्हणून मनाला भावतेस
मनातील भावनांचा खेळ सर्वांना दावतेस

मिञ मैत्रिणींच्या घोळक्यात छान रमतेस
सर्व भान विसरून मनसोक्त गप्पा मारतेस

कवी, गायिका, डान्सर या गुणांना वाव देतेस
काम आणि घर सांभाळत छंद आनंदाने जपतेस

तोंडावर हात ठेवून खूप भारी लाजतेस
जा बाई प्रेमा हे वाक्य तू छान म्हणतेस

तुझे ते गोड हास्य कायम चेहऱ्यावर असू दे
तुझ्या प्रगतीचा आलेख नेहमी चढताना दिसू दे

पूर्ण होवो तुझ्या मनीच्या सर्व आकांक्षा व इच्छा
प्रिय रुपाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
– प्रेमा