(आज बी बी सी मराठी पॉडकास्ट वर आम्ही दोघींनी (सुचिता मगर आणि मी) मिळून घातलेला गोंधळ.😂🤫😝)
प्रेमा- कुडकुत लहान मोठे सगळे गोधडीचा शोध घेई,😂
या थंडीने लोकांना खूपच घायाळ केलंय बाई.🙄😝😜
सुचि- थंडी सांगत आहे, अंडी खा
नाही तर म्हातारा साधू घे बाई🤣🤣🤣😂😂
प्रेमा- तुझं आपलं दुसरच काहीतरी सुरू असतं ताई,
अंडी नको मला सुरमई मासे हवेत बाई. 😛😛
योगिनी- नकोत अंडी, नकोत मजला मासे
आता नाशीकच मजला ऊटी भासे.🙄🙄
प्रेमा- महाबळेश्वर सोडून तुम्ही उटी का गाठताय ताई,
असे जवळचे सोडून पळत्याच्या मागे पडणे चांगले न्हाई. 😛😛
सुचि- मासे तळ समुद्रात गेले घाई घाई,
त्यांना वाटते प्रेमा त्यांना तळून खाईन बाई😂😂🤣
प्रेमा- सुरमई फ्राय फक्त माझी वाट पाही,😀
सुचे तू उगाच काहीपण बोलू नको बाई. 🙄🙄
सुचि- सागरी मासे कमी झाले बाई
त्यांना वाटे प्रेमा उपवास करून, जीवनदान देई😝😝
प्रेमा- उद्याच मी सुरमाईची भेट घेई,
ती स्वतःच उड्या मारत आनंदाने माझ्या पोटात जाई. 😂😂
सुचि-आजच मी समुद्रात जाळे टाकले बाई,
तुला बोंबील शिवाय दुसरा मासा काय भेटत न्हाई🤣🤣😂😂
प्रेमा- तू कितीही कर जाळे टाकण्याची घाई,🙄
पण सुरमई फक्त आणि फक्त माझीच होई. 😂😂
सुचि- सुरमई म्हणे पुण्यात समुद्र न्हाई😂😂🤣😝😝
उगाच तिथे मी का जाऊ बाई❓❓❓❓
प्रेमा- समुद्रात तुझे जाळे पसरणार नाही,🙄😂
उगीच माझ्या सुरमईला त्रास देऊ नको बाई. 🙄😛
सुचि- सुरमई म्हणते मी काय पुण्यात जात नसते बाई,
आपला वसई चा पचुबंदरच लई भारी ताई.😝
प्रेमा- तरी ती पुण्याची भेट घेण्यासाठी पळत येई. ❤️😛
तू काहीही कर तीचं माझ्यावरच प्रेम काही कमी होत न्हाई. 😂😂
सुचि- तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी, तिचा माहेरचा समुद्र माझ्याकडेच बाई
मी काय तिला पाठवत नसते तिकडे घाई घाई😝😝
प्रेमा- तुझ्या या गोंधळात ती माझ्याकडे आली पण ताई,😛
एकदम सुखाने चटक मटक करून मी तिचा उद्या आस्वाद घेई. 😋😂
– प्रेमा आणि सुचिता
January 25, 2022 at 4:50 pm
सुरमई चं तुझ्यावर प्रेम असलं तरी, तिचा माहेरचा समुद्र माझ्याकडेच बाई,
तू कितीही बोलली तरी मी तिला पाठवत नसते घाई घाई🤣🤣😂😂
January 25, 2022 at 4:53 pm
Mala pathav na!!
January 25, 2022 at 5:06 pm
ती नाही पाठवणार ताई.😂
January 25, 2022 at 5:05 pm
तू बस बोलत ती माझ्याकडे आलीय.🤣🤣
January 25, 2022 at 4:52 pm
Nashik vaate gehtli gaadi ter nuahi ka chalnar Suchi,mase khanya saathi mazhya jiwachi tadfad hoi!
January 25, 2022 at 5:06 pm
बघा ना ताई.😂😂
January 26, 2022 at 1:47 am
अरे काय मासे. काय सूरमै करताय……
मस्त गोव्याक जावा. नी सगळे प्रकार खावाक….
चलो ,. गोवा for surmai. Fish etc
January 26, 2022 at 4:31 am
इथे कोकणात पण मासे मिळतात हो. ज्यांना पोटात गरम हवंय ते गोव्याला जातात ताई.😂😂