खळखळत्या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मिळतो तो आनंद..🤗

पँटालुन्स समोर बसून शेजारच्या वस्तीतून येणाऱ्या मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारून मिळतो तो आनंद..🤗

गरजू व्यक्तीला मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपून मिळतो तो आनंद..🤗

समुद्रकिनारी वाळूवर लोळत रात्रीचे चांदणे पाहण्यात दंग होऊन मिळतो तो आनंद..🤗

गड, किल्ले, निसर्ग भटकंती करून ट्रेकिंग,
रॅप्लिंग करून मिळतो तो आनंद..🤗

खेळ व डान्स स्पर्धेत सहभागी होऊन
मनमुराद खेळून व नाचून मिळतो तो आनंद..🤗

समुद्रकिनाऱ्यावर बसून येणाऱ्या लाटांची
उंची मोजण्यात मग्न होऊन मिळतो तो आनंद..🤗

आवडते पुस्तक दिवसरात्र वाचून
पूर्ण करून मिळतो तो आनंद..🤗

समाजकार्यात स्वतःला निरपेक्ष
झोकून देऊन मिळतो तो आनंद..🤗

छोटे मोठे जोक करून दुःखीताला
हसवून मिळतो तो आनंद..🤗

समाजभान ठेवून मनाला योग्य
वाटेल तेच करून मिळतो तो आनंद..🤗

समाजात घडणाऱ्या घटना लेखणीतून
व्यक्त करून मिळतो तो आनंद..🤗

वरील सर्व गोष्टी करून मला
मिळतो तो स्व आनंद.🤗

तुम्ही पण कधीतरी अजमावून
पहा हा परम आनंद..🤗
– प्रेमा