तूच माझा कान्हा तूच माझा कन्हैया!
शरण आलो मी तुझीया पाया!!
ये लवकरी जगाचा या उद्धार कराया!
किती वाट पहावी तुझी आम्ही राया!!
भुरळ मनाला घाली तूझी लोभस काया!
देहभान हरपून आलो रे तुला पहाया!!
कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे तुझी छाया!
अशीच राहूदे तुझी आम्हावरी अपार माया!!
लहान थोर येती मनापासूनी तुला पुजाया!
माणसांत कोणतेही भेद नको तुला भजाया!!
तुझा हा सण आनंदाने साजरा कराया!
सद्बुद्धी दे आम्हाला तू कृष्ण देवराया!!
– प्रेमा
August 18, 2022 at 8:15 am
छान 😍
August 19, 2022 at 6:28 am
धन्यवाद!🙏😊
August 18, 2022 at 8:28 am
Khupach badhiya!!
August 19, 2022 at 6:28 am
धन्यवाद ताई!🙏😊