तुझ्या प्रेमाच्या लडिवाळ भाषेत

मी नखशिखांत न्हाऊन निघावं

असं तुझं प्रेम असावं.😍

 

माझ्याशी गप्पा मारताना

तुला वेळेचं भान नसावं

असं तुझं प्रेम असावं.😍

 

तुझ्या एका सहज स्पर्शाने

माझं तन मन रोमांचित व्हावं

असं तुझं प्रेम असावं.😍

 

माझ्या भेटीच्या आतुरतेनं

तू तहान भूक विसरवं

असं तुझं प्रेम असावं.😍

 

तुझ्या आश्वासक नजरेनं

माझ्या मनावर गारूड घालावं

असं तुझं प्रेम असावं.😍

 

माझ्या आठवणीने

तू मैलो दूर भेटण्यास यावं

असं तुझं प्रेम असावं.😍

– प्रेमा