संकटाना धावून येणारी

जिवाभावाची माणसे

लांब करतो हा गैरसमज.🙄

 

सदा सर्वदा असणारे

आनंदमय वातावरण

दूषित करतो हा गैरसमज.🙄

 

दोन सुखी जीवांच्या

प्रेमाच्या आड येत राग

उत्पन्न करतो हा गैरसमज.🙄

 

आनंदाने नांदणारे

सुखी कुटुंब उद्ध्वस्त

करतो हा गैरसमज.🙄

 

जीवाला जीव देणाऱ्या

जिवलग मैत्रीत भांडणे

लावतो हा गैरसमज.🙄

 

एवढे तोटे असूनही

माणूस त्याला कवटाळून

धरतो असा हा गैरसमज.🙄

– प्रेमा