कोवळया वयात पालकांचा दुरावा पत्करून कर्मचाऱ्यांचा द्वेष सहन करत लहानाच्या मोठ्या होतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

 

वयात आल्यावर आजूबाजूच्या वाईट नजरा चुकवून विद्यालयीन शिक्षण पूर्ण करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

 

जिद्दीने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभा राहतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

 

जीवनातील चढ उतार सांभाळत नेटाने संसार करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

 

समाजाशी एकरूप होऊन त्यांना हिनवणाऱ्यांचे तोंड बंद करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

 

सामाजिक भान जपून मनोमन सामाजिक कार्य करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊

– प्रेमा