दोन वर्ष कोरोनाचे सावटाने
केलं होतं सर्वांना बेधुंद,
या वर्षीच्या धुलीवंदनाचा
घेऊया छान आनंद.💐

नकारात्मकता विसरून सर्व
सप्तरंगी होळीत होऊया बेधुंद,
सर्व मिळून लुटूया आज
थोडा धुलीवंदनाचा आनंद.💐

सर्व दुःख विसरून भुकेले
जीव नाचत आहेत बेधुंद
सर्व बाळ गोपाळांच्या
चेहऱ्यावर दिसतोय आनंद.💐

रंग, डान्स आणि गाण्यात
सर्व झाले आहेत बेधुंद,
कोरोना काळात कुठेतरी
विरला होता हा आनंद.💐

उधळून उत्साहाचे सर्व रंग
जपू माणुसकीचे सर्व बंध,
सर्व संकटाना दोन हात करून
परत एकदा अनुभवू हा आनंद.💐

विसरून सारे बंधनं प्रेमाच्या
रंगात होऊया बेधुंद,
चला तर मग साजरा करूया
आजचा धुलीवंदनाचा आनंद.💐
– प्रेमा