तुमच्याकडे काही काम नसेल तर
तुम्हाला दूर लोटून देते ही दुनिया,
तुमच्याकडून काम करुन घेण्यासाठी
तुम्हाला डोक्यावर घेते ही दुनिया.😇

तुम्ही शांत असाल तर तुमच्या
डोक्यावर बसते ही दुनिया,
तुम्ही तोडीस तोड असाल तर
तुमच्या पासून लांब पळते ही दुनिया.😇

तुमच्याकडील समजदारीचा खूप
गैरफायदा घेते ही दुनिया,
तुम्ही नासमज असल्याचे दिसले की
तुमच्या पासून दूर राहते ही दुनिया.😇

अडचणी वेळी तुमच्या दुखऱ्या
नसेवर मीठ चोळते ही दुनिया,
तुम्ही सुखी असाल तर तुमच्या
पुढे मागे पळते ही दुनिया😇

तुम्ही सर्वसामान्य असाल तर सुख
दुःख कधी न विचारते ही दुनिया,
तुम्ही पदावर असाल तर तुमच्या
पुढे पुढे करते ही दुनिया.😇

जास्त विचार केला तर जिवंतपणी
मरण अनुभवायला लावते ही दुनिया,
दुनियेचा विचार करणं सोडून दिलं तर
शांत जीवन जगू देते ही दुनिया.😇
– प्रेमा