आवड म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे आवड असणं नक्कीच असतं.🥰

 

आकर्षण म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे आकर्षण वाटणं नक्कीच असतं.😍

 

आनंद म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे आनंद देणं नक्कीच असतं.🥰

 

ओढ म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे ओढ असणं नक्कीच असतं.😍

 

गप्पा म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे गप्पा मारणं नक्कीच असतं.🥰

 

शपथ म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे शपथ निभावणं नक्कीच असतं.😍

 

त्रास म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे त्रास होणं नक्कीच असतं.🥰

 

भान म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे भान नसणं नक्कीच असतं.😍

 

काळजी म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे काळजी करणं नक्की असतं.🥰

 

आठवण म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम

म्हणजे आठवणीत झुरणं नक्की असतं.😍

– प्रेमा