कार्यकर्ते आंदोलनासाठी
पेटून उठले की,
चक्का जाम होतो.😅

मैदा आणि साखरेचा
पाक एक झाले की,
गुलाब जाम होतो.😀

डोकं भनभनून हात
बाटलीकडे गेला की,
प्याला जाम होतो.😅

फळ आणि साखरेचं
मिश्रण झालं की,
फ्रूट जाम होतो.😀

मनाविरुद्ध काही
विपरीत घडलं की,
डोकं जाम होतं.😅

अनेक वाहनांनी एकत्र
येऊन गर्दी केली की,
रस्ता जाम होतो.😀

जाम शब्द वेगवेगळ्या
ठिकाणी वापरला की,
सगळं जाम होतं.😅

जाम शब्दामध्ये आपापली
वेगवेगळी मजा शोधली की,
आयुष्यात आनंद जाम होतो.😀
– प्रेमा