मीच तुझ्या प्रेमात वेडी व्हायचे; पण आत्ता
कळतंय की, तू फक्त तुझाच होतास.😔

मीच तुला नात्याचा मान द्यायचे; पण आत्ता
कळतंय की, तू त्याच्या अधिकारी नव्हतास.😔

मीच तुझ्या मागे मागे असायचे ; पण आत्ता
कळतंय की, तू अहंकारात डुंबत होतास.😔

मीच तुला नेहमी मनवायचे; पण आत्ता
कळतंय की, तू मला किंमत देत नव्हतास.😔

मीच तुझा सतत विचार करायचे; पण आत्ता
कळतंय की, तू तुझ्यात मशगुल होतास.😔

मीच तुला माझा समजायचे; पण आत्ता
कळतंय की, तू कधीच माझा नव्हतास.😔
– प्रेमा