तुझ्या कामात चूक काढता येत नाही, म्हणून
विचित्र लोकं तुझ्या चारित्र्यावर बोलतील; पण
तू दुर्लक्ष कर.😊
तुला कमी लेखण्यासाठी विचित्र लोकं
एखादी संधी शोधतील; पण न डगमगता
तू दोन हात कर.😊
तुझे कार्य वरचेवर सरस होतंय, म्हणून विचित्र
लोकं संकटात आणण्याचा प्रयत्न करतील; पण
तू पुरून उर.😊
तुझा पराक्रम बघून विचित्र लोकं नवीन चाल
चालण्यासाठी हिरीरीने सज्ज होतील; पण
तू सामना कर.😊
तुला काहीच फरक पडत नाही; म्हणून विचित्र
लोकं तुझ्या जवळच्यांना विरुद्ध उभा करतील; पण
तू स्वीकार कर.😊
पावलोपावली तुला छळणाऱ्या विचित्र लोकांना
एक दिवस तुझ्याच उपकाराखाली यावे लागले; तर
तू सन्मान कर.😊
– प्रेमा
March 28, 2022 at 2:30 am
🎉💕 Stay Tuned… अप्रतिम ❤️
March 28, 2022 at 2:35 am
Thank you so much.🙏😊
March 28, 2022 at 4:54 am
अगदी खरय… परिस्थितीचा स्विकार करण्यातच आनंद आहे… 👍👍👍
March 28, 2022 at 6:38 am
धन्यवाद दादा.🙏😊
March 28, 2022 at 5:24 am
It’s an important life lesson. Very well written!
March 28, 2022 at 6:38 am
Thank you Tai.🙏😊