घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण
कराव्यात ही मागणी माझ्याकडूनच का?🤔

घराची इज्जत राखण्यासाठी समाजाची
सर्व निर्दयी बंधने माझ्यावरच का?🤔

घरदार सांभाळून येणारे पाहुणे रावळे
जपण्याची जबाबदारी माझ्यावरच का?🤔

बाईपण सिध्द करण्यासाठी बाळाला
जन्माला घालण्याची सक्ती माझ्यावरच का?🤔

कामाच्या ठिकाणी चोख जबाबदारी
बजावूनही नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक का?🤔

संसाराच्या कसरतीत सासर माहेर
सांभाळूनही दोन्हीकडे दुय्यम स्थान का?🤔

एकविसाव्या शतकात सर्व क्षेत्रात पुढे
असूनही स्त्री म्हणून अजूनही हिनवण का?🤔

सर्व कौशल्य आत्मसात करून पुरुषाच्या
खांद्याला खांदा लावून चालते म्हणून का?🤔
– प्रेमा