कधी कधी वाटतं एक अदृश्य असा साथी असावा,
आपले मन न सांगता तो आपोआप जाणून बसावा.
स्वतःचे सुख दुःख आपल्या समोर खुले करावा,
न घाबरता तो आपल्या भोवती गुणगुणत रहावा.
कधीतरी आपल्यातील चांगल्या गोष्टींचा पाढा वाचावा,
हवेतल्या गप्पा न करता कधीतरी वास्तव संवाद साधावा.
एकसंध बडबड न करता आपले बोलणे पण ऐकावा,
त्याच्या विषयीच्या आपल्या भावना पण कधीतरी जाणून घ्यावा.
कोणाचाच कोणावर कसलाच अधिकार नसावा,
एकमेकांना या नात्याचा पूर्णपणे आदर असावा.
कधी कधी वाटतं अनोळखी व आभासी असा साथी असावा,
आपले वास्तव पडताळून पाहण्याचा त्याचा कधीच अट्टाहास नसावा.
– प्रेमा
April 27, 2021 at 11:43 am
मस्त
April 27, 2021 at 12:31 pm
मनापासून धन्यवाद.🙏😊
May 23, 2021 at 6:15 am
Mast….
May 23, 2021 at 6:50 am
मनापासुन धन्यवाद!🙏☺️
December 9, 2021 at 4:42 am
वाहहहहहह वाहहहहह…. खरच असा एखादा साथी सर्वांना मिळावा 👍👍👍
December 9, 2021 at 4:47 am
धन्यवाद दादा!🙏😊
December 9, 2021 at 5:00 am
Ho nakkich asa sathidar asava ani to jer apla Jeevan Saathi asel Ter sone pe suhaga. Yuki la pathavu ka? Chan lihila ahes.
December 9, 2021 at 5:11 am
Yes Tai. आपला जीवनसाथी तर एक नंबर आहे.👍😀 पाठवा की लगेच.😀
धन्यवाद!🙏😊
December 10, 2021 at 9:17 am
मग काय तर. हवाच कोणीतरी असाच नक्कीच
December 11, 2021 at 1:07 am
धन्यवाद ताई.🙏😊