काय जादू केलीस सखे
तुझ्यावरची माझी नजर हटतच नाही,
तू समोर असताना दुसऱ्या
कोणालाही पाहू वाटतच नाही.
तुझा तो साज श्रृंगार पाहून
होतो मी आपसूक घायाळ,
कधी घालशील तुझ्या
हातांची माझ्या गळ्यात माळ.
तू समोर असताना फक्त
तुझ्याकडे एकटक पाहतो,
खुश होऊन तुझ्या प्रेमाच्या
रंगात मनोमन नहातो.
बास कर आता असा हा
तुझा नजरेचा इशारा,
तुझ्या या अवखळ नजरेचा
दिवाना जग सारा.
तूच सांग सखे माझ्या
मनाला कसे मी सावरू,
तुझ्या प्रेमाचा भुकेला
मी स्वतःला कसा आवरू.
न लाजता ये अशी माझ्या
जवळ होऊनी बेधुंद,
आज साजरा करूया
आपल्या प्रेमाचा आनंद.
– प्रेमा
April 10, 2021 at 6:03 pm
खूप छान आहे . सहज समजेल अशी
April 11, 2021 at 7:42 am
मनापासुन धन्यवाद.🙏☺️
April 10, 2021 at 6:05 pm
खूप सुंदर
April 11, 2021 at 7:41 am
मनापासुन धन्यवाद.🙏☺️
December 10, 2021 at 3:58 am
वाहहहहहहह क्या बात है…. 👍👍👍
कोण हा नशिबवान माणूस?? 😃👍👍👍
December 10, 2021 at 4:20 am
ओळी वाचणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला नशीबवान समजावे.😂😂
धन्यवाद दादा!🙏☺️
December 10, 2021 at 4:56 am
Khup marmik kavita. Mala bhavli
December 10, 2021 at 5:12 am
धन्यवाद ताई.🙏☺️