प्रत्यक्षात नाही जमलं तर

प्रिये स्वप्नात येऊन बोल,

तुझ्या मनातील या निरागस

प्रेमाचे सर्व भाव खोल.

तू समोर असताना प्रिये

असतो मी नेहमीच अबोल,

माझ्या या निस्सीम प्रेमाला

जरा नजाकतेने तोल.

जास्त नको पण थोडी प्रिये

माझ्या या प्रीतीत डोल,

विश्वास ठेव करणार नाही

कधी तुझ्याशी प्रेमाचा झोल.

कसं समजावू प्रिये तुला आहेस

माझ्यासाठी तू खूप अनमोल,

माझ्या या निस्वार्थी प्रेमाचे

तुला कळेल कधी ग मोल.

– प्रेमा