देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
तुला असचं सतत आनंदी पहायचं आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
जीवनातील सुख तुझ्या सोबत अनुभवायचं आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
कायम तुझा आधार म्हणून राहायचं आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
आयुष्याचा प्रवास तुझ्या सोबत करायचा आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
तुझ्यावर भरभरून प्रेम करायचं आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
अखेरचा श्वास तुझ्या मिठीत घ्यायचा आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
प्रेमाची सावली बनून तुझंच व्हायचं आहे.😊
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त
कातरवेळी तुझ्या मिठीत स्वप्न रंगवायचे आहे.😊
– प्रेमा
February 20, 2022 at 8:16 am
Khooopach chhaann 👍👍👍👍
February 20, 2022 at 8:17 am
धन्यवाद दादा.🙏😊
February 20, 2022 at 9:28 am
List dili ki devala!!😄😄
Pan wah wah mhanav itka chan ahe!!!!
February 20, 2022 at 11:53 am
😂😂
Thank you Tai.🙏😊