तुझी मनधरणी करून
आपलं नातं जपायला
मी खरंच कंटाळले आहे.😔
तुझ्या कामाच्या गराड्यात
संसारात मन रमवायला
मी खरंच कंटाळले आहे.😔
माझा विचार न करणाऱ्या
तुला नात्याचा मान द्यायला
मी खरंच कंटाळले आहे.😔
तुझ्या तोंडून राजकारण ऐकुन
परत त्याच त्याच बोलण्याला
मी खरंच कंटाळले आहे.😔
भावना समजून न घेणाऱ्या
तुझ्या गप्पा मारण्याला
मी खरंच कंटाळले आहे.😔
नात्यांचा ओलावा सोडून तुझ्या
वरवरच्या संवाद साधण्याला
मी खरंच कंटाळले आहे.😔
– प्रेमा
March 9, 2022 at 3:15 am
You present very nicely feelings 👌
March 9, 2022 at 3:21 am
Thanks Dear.🙏😊
March 9, 2022 at 3:21 am
Aaj he asa ka? Ups and downs are part of love and life.
March 9, 2022 at 3:23 am
समाजातील चित्र रेखाटण्याचा एक प्रयत्न.😊
Part of life.👍😀
Thanks Tai.🙏😊
March 9, 2022 at 4:21 am
खूपच छान… अशा मनस्थितीत अनेक जण/जणी असतात…. चांगली मांडलीस व्यथा 👍👍👍
March 10, 2022 at 2:43 am
धन्यवाद दादा.🙏😊
March 9, 2022 at 12:29 pm
अप्रतिम 💕
March 10, 2022 at 2:43 am
धन्यवाद.🙏😊