माझे दुःखी मनातील यातना
तुझ्या समोर मोकळे करायला,
माझे जीवनातील सुख
डोळेभरून पाहायला;
मज जवळ हवीस तू.🤗

माझे आयुष्यातील सुखी
क्षण वाटून घ्यायला’
माझ्या उभारीच्या पडत्या
काळात धीर द्यायला;
मज जवळ हवीस तू.🤗

माझा चेहरा हातात घेऊन
भालावर ओठ टेकवायला,
तुझ्या प्रेमाच्या स्पर्शात
विरघळून जायला;
मज जवळ हवीस तू.🤗

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर सोबत चालायला,
अडचणी वेळी भक्कम
आधाराचा खांदा द्यायला;
मज कायम जवळ हवीस तू.🤗

माझ्या प्रेमाचा अंकुर
तुझ्या उदरात वाढवायला,
माझा शेवटचा श्वास
तुझ्या मिठीत घालवायला;
मज जवळ हवीस तू.🤗
– प्रेमा