तुझ्या सहवासात माझं मन

हळूच पिंगा घालतं,

गंमती जमती आठवून

हळूच ओठांवर हसू फुलतं.😘

 

तुझ्या आठवणीत माझं

हे वेडं मन खूप झुरतं,

प्रेमाचा स्पर्श आठवून

हळूच स्वतःला सावरतं.😘

 

तुझ्या वचनात हे मन

नकळत गुंतून जातं,

तुला समोर पाहून

आनंदाने तरंगत राहतं.😘

 

तुझ्या या साथीने हे मन

खूपच वेड होतं,

प्रेमाचा हात हातात घेऊन

जीवन गाणं गातं.😘

 

तुझ्या जवळ हे मन

विश्वासाने मोकळं होतं,

कोणत्याही वेळी नेहमी

साथ देण्याचं वचन देतं.😘

 

तुझ्या मिठीत हे मन

प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलतं,

तुझं हे भालावरचं चुंबन

नेहमीच आश्र्वस्थ करतं.😘

– प्रेमा