कविता वाचून भरभरून

प्रतिसाद देणारा असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.🤗

 

कविता वाचून ही कविता कोणा

विषयी आहे? असे विचारणारा असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.😂

 

कविता वाचून सकारात्मक

दृष्टीने सुधारणा सुचवणार असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.☺️

 

कविता वाचून प्रतिक्रिया देण्यास

आळशीपणा करणारा असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.😝

 

कविता वाचून ही कविता माझ्यावर

लिहिली म्हणून डोकं खाणारा असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.🙄

 

कविता वाचून खूप सारे

प्रोत्साहन देणारा असा हा

माझा निवडक वाचक वर्ग.🥰

– प्रेमा