आकाशाचे जसे धरतीवर आहे
प्रेमाने बहरण्यावर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.😍

किनाऱ्याचे जसे लाटांवर आहे
भेटीच्या ओढिवर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.🥰

समुद्राचे जसे सरितेवर आहे
मिलनाच्या आतुरतेवर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.😍

सूर्याचे जसे पृथ्वीवर आहे
भेटीसाठी व्याकूळ होण्यावर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.🥰

पावसाचे जसे निसर्गावर आहे
ओलेचिंब भिजवून पाहण्यावर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.😍

मोराचे जसे लांडोरवर आहे
थुईथुई नाचून आनंदात पाहण्यावर आहे
अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.🥰

हो अगदी तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे
हो अगदी तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे.😍
– प्रेमा