तू माझ्या घरी येता
सगळे दुःख विसरून
मज खूप आनंद होई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
तूझ्या प्रेमळ भेटीने
आप्तेष्टांच्या वागण्याचा
सर्व जर ओसरून जाई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
अडचणीच्या काळात
तुझे मोलाचे सहकार्य लाभणे
ही माझी गत जन्मीची पुण्याई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
तूझ्या अनुभवाचे बोल
योग्य बालसंगोपनाची
वेळोवेळी आठवण करून देई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
अडचणींवर मात करण्याचे बळ देत
तूझ्या प्रेमळ सोबतीने
सद्य परिस्थितीतून पुढे नेई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
या जन्मी तरी माझ्याने
कधीही फेडता न येणारे
तुझे उपकार माझ्यावर लई
तूच खरी माझी यशोदा माई.😊
– प्रेमा
Leave a Reply