माहिती आहे तुझ्या कामाचा प्रवास

त्यात सहज सुधारणा होत नाही,

तापून सलाकुन निघाल्या शिवाय

समस्यांना दोन हात करता येत नाही.😊

 

कळते आम्हाला पण धडपड तुझी

ध्येयपूर्ती त्याविन होत नाही,

स्वतःला त्यात झोकून दिल्या शिवाय

शल्का माल हाताला येत नाही.😊

 

जीवनात सोसल्या जरी तू अनेक गोष्टी

तुझ्याकडे पाहून त्या कोणाला उमजत नाही,

तुझ्या प्रगतीची वाह वाह झाल्या शिवाय

समाजाला तुझे महत्त्व समजत नाही.😊

 

बघ स्वतःकडे थोडे मागे वळून

तुझे कोणा वाचून काही अडत नाही,

कुटुंबाची साथ असल्याशिवाय

प्रेमाचे सांगणे हे समाजकार्य घडत नाही.😊

 

तुझ्या आयुष्यात येणारे चढउतार

त्याकडे कोणी बारकाईने पाहत नाही,

प्रगतीच्या वाटेवर चालल्या शिवाय

स्वकर्तृत्वाची जाणिव होत नाही.😊

 

मदतीला धावून जात माणूसकी जपताना

ओळख समाजात सहज मिळत नाही,

सिद्ध करण्याची घटना घडल्याशिवाय

स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कळत नाही.😊

 

सुख दुःखात त्याला साथ देतेस

तडजोडी विना आनंद मिळत नाही,

तुझी चांगली साथ असल्याशिवाय

त्याचा संसार सुखाचा होत नाही.😊

 

एकत्र येऊन लढ हक्कासाठी

स्व अधिकार सहज मिळत नाही,

अधिकारासाठी संघर्ष केल्याशिवाय

सोंग घेणाऱ्यांना नारी शक्ती कळत नाही.😊

 

प्रत्येक अडचणीला तू जिद्दीने तोंड देते

ही गोष्ट लोकांच्या नजरेतून सुटत नाही,

रोलमॉडेल म्हणून बघण्याशिवाय

तुझ्यावरची त्यांची नजर हटत नाही.😊

 

बघ स्वतःकडे थोडे मागे वळून

तुझे कोणा वाचून काही अडत नाही,

कुटुंबाची साथ असल्याशिवाय

प्रेमाचे सांगणे हे समाजकार्य घडत नाही.😊

– प्रेमा