तशी आपली भेट तर फेसबुक वरचीच,
पण प्रत्यक्ष भेटीला लाजवेल अशीच.☺️

चांगला लेखक, मनमिळावू, मिश्किल स्वभाव, उमदा चित्रकार,
तुमच्या गुणांचा लोकं करत आहेत जयजयकार.😊

तुमच्या मैत्रीचे अजुन काय गोडवे गायचे,
ग्रुप सदस्य सच्चा माणूस तुमच्यात शोधायचे.😍

तुम्ही चांगला माणूस म्हणून कायम मनात रहाल,
सदस्यांच्या आठवणीतून सगळ्यांना भेटायला याल.❤️

‘मिल बैठेंगे दो यार’ या वाक्यातून तुम्ही सगळ्यांच्या लक्षात राहणार,
मास्तर तुमच्या मैत्रीची सर दुसऱ्या कशाला नाही येणार.🥰

कोणत्याही विषयावर आपली मैफिल छान रंगायची,
मनसोक्त गप्पा नंतर ती बाटलीवर जाऊन थांबायची.😀

प्रत्यक्ष भेट न झाल्याची उणीव कायम छळत राहणार,
आपली निस्वार्थी मैत्री या स्वार्थी जगाला नाही कळणार.😌

जागुनी घ्या जरा म्हणत लोकांना हसवले,
लवकर एक्झीट घेऊन तुम्ही आम्हाला फसवले.😔

गेलात तिथे सगळ्यांना हसवत आणि सुखी रहाल,
खात्री आहे की, तुमच्या चांगल्या स्वभावामुळे पुनर्जन्म घ्याल.🤗

प्रिय मास्तर तुम्हाला प्रेमाकडून भावपूर्ण आदरांजली. 🙏💐
– प्रेमा