अधून मधून कधीतरी

नोकझोक थोडी असावी;

तूझ्या माझ्या प्रेमात

चॉकलेटची गोडी असावी.🤗

 

मी रुसले तर तुझी मला

मनवण्याची तयारी असावी;

तुझा ही रुसवा काढण्यासाठी

मी बावरी असावी.🥰

 

दोघांनाही आवडत नसेल जरी

चॉकलेट तरी त्याची गोडी असावी;

प्रेम व्यक्त करण्याची दोघांना

पण सवय थोडी असावी.🤗

 

तू नजरेआड झालास तर मी तुला

पाहण्यासाठी कावरीबावरी असावी;

अचानक तुला पाहून हळूच लपत

माझी नजर लाजरी असावी.🥰

 

तुझ्या माझ्यात चॉकलेटच्या

रंगा सारखी गडद प्रीती असावी;

आपले प्रेम न विसरणारी

जीवनाची एक गोड स्मृती असावी.🤗

 

आपलं प्रेम म्हणजे विश्वासाची

एक जोडगोळी असावी;

तुझी माझी प्रीत थोडी

जगाच्या निराळी असावी.🥰

– प्रेमा