तू प्रपोज न करता ही फक्त
तुझ्या बोलण्यातून प्रेम जाणवतं.♥️

तू प्रपोज न करता ही फक्त
तुझ्या डोळ्यातून प्रेम जाणवतं.♥️

तू प्रपोज न करताही फक्त
तुझ्या सहवासातून प्रेम जाणवतं.♥️

तू प्रपोज न करता ही फक्त
तुझ्या काळजीतून प्रेम जाणवतं.♥️

तू प्रपोज न करता ही फक्त
तुझ्या स्पर्शातून प्रेम जाणवतं.♥️

तरी ही वाटतं तू ही कधी तरी
मला जरा हटके प्रपोज करावं.♥️

जगाचं भान विसरून प्रेमाच्या
या झुल्यावर दिलखुलास झुलावं.♥️
– प्रेमा