चॉकलेट होतंय आता प्रेमाचं प्रतीक भावा,

ज्याला याचं गुपित कळलं तोच जिंकेल प्रेमाचा हा दावा. 🤣

चॉकलेट ऐवजी गूळ शेंगदाणे चिक्की दिली तर फायदा होईल,

अनेमिया कमी करण्याचा दिवस म्हणून त्याचा डंका होईल.🤣

करू नकोस मित्रा चॉकलेट डे चा विचार फार,

कितीही प्रयत्न कर चॉकलेट डे ला पत्करणार तू हार.🤣

जरी तारांबळ उडून खिशाला कितीही आला भार,

तरीही मित्रा तुला याच डे ज ची आतुरता फार फार. 🤣

लक्षात ठेव मित्रा तिला मनवण्यासाठीचे जर तुझे सर्व प्रयत्न हुकलेत,

रुसवा तिचा काढण्यासाठी आणून दे फक्त एक डेअरीमिल्क चॉकलेट.🤣

पुन्हा उभा राहतोस मित्रा जरी कितीही वेळा दिला तिने नकार,

बघ मित्रा तुझ्यासाठी प्रेमाची चॉकलेट डे ची कविता झाली साकार.🤣

– प्रेमा